AI वापरून आपण content लिहितो, emails तयार करतो, reports बनवतो किंवा coding करतो. पण आता एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतोय. AI ने तयार केलेला content भविष्यात ओळखता येणार आहे का?
Anthropic ने Claude च्या 2 August 2026 नंतर launch झालेल्या models मध्ये text outputs साठी एक नवीन पद्धत वापरण्यास सुरुवात केली आहे. Claude तयार करत असलेल्या मजकुरामध्ये statistical patterns embed केले जात आहेत. हे patterns साध्या copy-paste किंवा हलक्या editing नंतरही टिकू शकतात.
याशिवाय images सारख्या files मध्ये C2PA metadata देखील जोडले जात आहे. यामागचा मुख्य उद्देश AI-generated content बाबत अधिक transparency आणणे हा आहे.
म्हणजे नेमकं काय होणार?
समजा तुम्ही Claude ला एखादा article लिहायला सांगितला. Claude च्या output मध्ये दिसायला काहीही वेगळे नसेल. पण त्यामध्ये invisible statistical patterns असू शकतात.
भविष्यात उपलब्ध होणाऱ्या detection tools च्या मदतीने हा content Claude कडून process झाला आहे का, हे verify करता येऊ शकते.
पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे.
याचा अर्थ असा नाही की त्या पूर्ण content चा author Claude आहे.
एखाद्या व्यक्तीने Claude कडून draft तयार करून त्यात स्वतःचे ideas, research आणि मोठ्या प्रमाणात editing केली असेल, तर watermark किंवा detection फक्त Claude चा involvement दाखवू शकते. पूर्ण authorship नाही.
यामुळे कोणते प्रश्न निर्माण होतात?
ही technology transparency साठी उपयोगी ठरू शकते. पण त्याचवेळी काही concerns देखील आहेत.
जर एखाद्या writer ने AI च्या मदतीने फक्त grammar सुधारली किंवा content edit केला, तरी त्या writing मध्ये AI-related marks राहतील का?
AI वापरणाऱ्या professionals आणि creators साठी हा प्रश्न महत्त्वाचा ठरू शकतो.
दुसरीकडे, AI-generated content आणि human-generated content यामधील फरक अधिक स्पष्ट करण्यासाठी अशी technology उपयोगी ठरू शकते.
Anthropic चा हा approach AI transparency बद्दल सुरू असलेल्या मोठ्या चर्चेचा एक भाग आहे.
AI content ओळखण्याची technology वाढत असताना, पुढचा प्रश्न फक्त "हा content AI ने तयार केला आहे का?" असा राहणार नाही.
प्रश्न असा असेल:
"AI ने content तयार करण्यामध्ये नेमकी किती भूमिका बजावली?"
आणि कदाचित पुढच्या काही वर्षांत content creation मध्ये हा एक महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे

