HVCO म्हणजे काय? Value-Based Marketing मध्ये Give Before You Ask कसं काम करतं?
Digital Marketing

HVCO म्हणजे काय? Value-Based Marketing मध्ये Give Before You Ask कसं काम करतं?

HVCO म्हणजे काय आणि Value-Based Marketing मध्ये त्याची भूमिका काय? “Give Before You Ask” या strategy मधून customer trust आणि engagement कसं build करता येतं ते जाणून घ्या.

Prathamesh Sakhadeo

लेखक

Prathamesh Sakhadeo

42 व्ह्यू 0 प्रतिक्रिया

मागच्या ईमेलमध्ये आपण HVCO या interesting concept बद्दल बोललो होतो.

HVCO म्हणजे High Value Content Offer आणि हा Value-Based Marketing चा एक महत्त्वाचा भाग आहे.

यामागची कल्पना अगदी सोपी आहे:

“Give before you ask.”

आज सोशल मीडिया उघडला की प्रत्येक ठिकाणी एकच आवाज ऐकू येतो.

Buy Now. Book a Call. Get Started.

या वाढत्या promotional noise मध्ये सतत काहीतरी विकण्यापेक्षा, आधी ग्राहकाला काहीतरी valuable द्या.

उदाहरणार्थ, तुम्ही Digital Marketing Agency असाल तर प्रत्येक पोस्टमध्ये “आमची service घ्या” म्हणण्याऐवजी एक SEO Checklist, Marketing Guide किंवा useful template द्या.

ग्राहकाला प्रत्यक्ष मदत झाली, तर तुमच्याबद्दल trust आणि goodwill तयार होऊ लागतो.

आणि इथेच HVCO काम करतं.

पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा.

HVCO म्हणजे फक्त Free Content नाही. तो खरंच High Value असला पाहिजे.

यासोबत आणखी एक principle महत्त्वाचं आहे:

“The temperature of your marketing message should match the temperature of your traffic.”

जो ग्राहक तुम्हाला पहिल्यांदाच पाहतोय, त्याला लगेच “Buy Now” म्हणण्यापेक्षा Value द्या.

जो तुम्हाला आधीपासून follow करतोय, त्याच्यासोबत Trust build करा.

आणि जो खरेदीसाठी तयार आहे, त्याला Offer द्या.

कारण आज ग्राहकाला आणखी एका sales pitch ची गरज नाही.

त्याला आधी हे जाणवायला हवं की,

“हे brand खरंच मला मदत करू शकतं.”

आणि तिथूनच Value-Based Marketing ची सुरुवात होते.

चर्चा

चर्चेत सामील व्हा

अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही. प्रथम आपले विचार सांगा!