AI आता फक्त उत्तर देणार नाही, निर्णयही घेणार
AI

AI आता फक्त उत्तर देणार नाही, निर्णयही घेणार

AI is moving beyond just answering questions. New models like TypeSafe’s System One and Jev show how AI can help software make decisions and take action. Let’s understand this shift in simple terms.

Prathamesh Sakhadeo

Author

Prathamesh Sakhadeo

16 views 0 comments

आपण गेल्या काही वर्षांत AI मध्ये खूप मोठा बदल पाहिला आहे.

सुरुवातीला AI चा वापर basic questions ची answers मिळवण्यासाठी केला जात होता. त्यानंतर AI writing, image generation, coding, presentations, research आणि data analysis यांसारख्या कामांमध्ये वापरली जाऊ लागली.

आज आपण ChatGPT सारख्या tools ला प्रश्न विचारतो आणि काही सेकंदांत आपल्याला एक complete answer मिळतो.

पण आता AI मध्ये आणखी एक महत्त्वाचा बदल होत आहे.

AI फक्त उत्तर तयार करण्यापेक्षा software ला निर्णय घेण्यात मदत करण्याच्या दिशेने पुढे जात आहे.

 याच दिशेतील एक उदाहरण म्हणजे TypeSafe ने सादर केलेले System One models आणि त्यांचा पहिला model, Jev.

आजचे AI आणि  पुढचे AI   

समजा तुम्ही AI ला विचारले:

"या customer च्या complaint ला reply तयार करून दे."

AI तुम्हाला एक complete reply लिहून देईल.

ही आहे आज आपण मोठ्या प्रमाणावर वापरत असलेली AI.

पण business software ला नेहमी complete paragraph ची गरज नसते.

कधी कधी software ला फक्त एक decision हवा असतो.

उदाहरणार्थ, एखाद्या company कडे रोज हजारो customer enquiries येतात.

प्रत्येक enquiry वाचून ठरवायचे आहे:

  • हा Sales चा lead आहे का?

  • हा Customer Support चा issue आहे का?

  • हा urgent आहे का?

  • हा genuine customer आहे का?

  • यावर लगेच action घ्यायची गरज आहे का?

इथे AI ने मोठा paragraph लिहिण्याची गरज नाही.

AI ने फक्त योग्य decision द्यायचा आहे.

उदाहरणार्थ:

Category: Sales
Priority: High
Action: Sales Team कडे पाठवा

यामुळे software त्या decision वर पुढचे काम automatically करू शकते.

हीच या नव्या approach ची basic idea आहे.

 Jev म्हणजे काय?   

TypeSafe ने सादर केलेला Jev हा त्यांचा पहिला System One model आहे.

सोप्या भाषेत सांगायचे तर, Jev चा focus माणसासाठी सुंदर आणि मोठे answers तयार करण्यापेक्षा software ला structured decisions देण्यावर आहे.

हे का महत्त्वाचे आहे?

कारण business मध्ये अनेक decisions असे असतात ज्यासाठी माणसाला 500 शब्दांचा AI-generated answer नको असतो.

त्याला फक्त योग्य decision हवा असतो.

समजा एका e-commerce company कडे customer चा message आला:

"माझा order अजून आलेला नाही आणि मला refund हवा आहे."

एक सामान्य AI कदाचित customer साठी reply तयार करेल.

पण decision-making AI त्या message मधून माहिती समजून software ला सांगू शकते:

Issue: Delivery Problem
Refund: processing
Priority: High

आता company च्या software ला पुढे काय करायचे हे समजू शकते.

Customer Support ticket तयार होऊ शकतो.

Refund process सुरू होऊ शकतो.

Priority वाढवली जाऊ शकते.

आणि हे सर्व AI ने दिलेल्या decision वर आधारित असू शकते.

हे ऐकायला technical वाटू शकते. पण यामागची basic idea खूप सोपी आहे.

Discussion

Join the conversation

No comments yet. Be the first to share your thoughts!